आयुर्वेद हा संस्कृत भाषेतील शब्द असून त्याचा संधिविग्रह (आयुः) जीवन + विद्या (वेद) अशाप्रकारे होतो. आयुर्वेदाची सुरवात ब्रह्मापासून झाली असे मानले जाते. आयुर्वेद आणि त्यासारख्या विद्याशाखांमधून भारतात प्राचीन काळापासून असलेल्या वैद्यकीय ज्ञानाची कल्पना येते. आयुर्वेदाला सुमारे ३००० वर्षापासून चालत आलेली व्यापक आणि उत्तुंग परंपरा आहे. आयुर्वेदातील उपचार पद्धतींमध्ये वनौषधी, वनस्पतीजन्य औषधी, आहाराविषयक नियम, व्यायामाचे विविध प्रकार, आणि त्याद्वारे शरीरातील नैसर्गिक प्रतिकार शक्तीला वाढविण्यावर भर दिला जातो. कर्नाटकातील सोमनाथपुर येथील धन्वंतरीची प्रतिमा आयुर्वेदातील सिद्धान्त आणि औषधे आधुनिक विज्ञानाच्या clinical trials या पद्धतीनुसार तपासलेली नसतात. त्यामुळे आयुर्वेदाची विश्वसनीयता वाढवण्यासाठी या प्रत्यक्ष वैद्यकीय चाचण्यांची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे काही लोकांचे मत आहे.
आयुर्वेदिक औषधांचा विशेषतः मुलांना उपयोग होतो. आर्युवेदानुसार एका वर्षाची वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत व शिशिर अशा सहा ऋतुंमध्य विभागणी केलेली आहे. त्या त्या ऋतुंमधील होणाऱ्या वातावरणातील बदलांप्रमाणे आपला आहारविहार कसा असावा याचे फार उत्तम वर्णन आयुर्वेदामध्ये केलेले आहे. यालाच ऋतुचर्या असे म्हणतात.[आयुर्वेदातील काही वनस्पती औषधांचे संदर्भ हे मुख्य चार वेदांपैकी एक असलेल्या अथर्ववेद या इसवी सनपूर्व सुमारे १२०० मध्ये रचल्या गेलेल्या वेदामधून घेतले आहेत. अथर्ववेदात आयुर्वेद शास्त्राचे अधिक वर्णन आहे. म्हणून आयुर्वेदाला अथर्ववेदाचा उपवेद मानतात आणि त्यामुळे आयुर्वेद हा अथर्ववेदाचा एक घटक समजला जातो. तथापि, विशेषतः गौतम बुद्धाच्या आणि त्यानंतरच्या काळात, आयुर्वेदामध्ये अनेक मोलाच्या गोष्टींची भर घालण्यात आली.